यूपीएससीचा निकाल जाहीर ; गिरीश बडोले राज्यात प्रथम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |



मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग-२०१७ च्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाराष्ट्र राज्यातून गिरीश बडोले हा विद्यार्थी राज्यात प्रथम आला आहे. गिरीशने अत्यंत उज्ज्वल कामगिरी करत, राज्यात प्रथम तर संपूर्ण देशात विसावा क्रमांक पटकावला आहे.
आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नुकताच काही वेळापूर्वी हा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्र राज्यातील एकूण १६ विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १४ विद्यार्थी आणि २ विद्यार्थींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील आठ विद्यार्थी हे पहिल्या शंभरमध्ये येण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. ज्यामध्ये वैदेही खरे नावाच्या एका विद्यार्थींनीचा देखील समावेश आहे.

याचबरोबर संपूर्ण देशातून तेलंगणा राज्याने परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तेलंगणा राज्यातील दुरिशेट्टी अनुदीप हा विद्यार्थी संपूर्ण देशात प्रथम आला आहे. तर त्यानंतर अनु कुमारी या विद्यार्थीनींने दुसरा तर सचिन गुप्ता नावाच्या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
@@AUTHORINFO_V1@@