कपाशीसाठी शेतकर्‍यांनी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |

कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांची माहिती

जळगाव :
जिल्ह्यात रोखीचे पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशीच्या पीक पेरणीवर शेतकर्‍यांचा कल असतो. जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार कपाशीच्या क्षेत्राची नोंद आहे. त्यानुसार पावसाळा सुरु होण्याआधी शेतकरी कपाशीच्या लागवडीच्या कामांना वेग देतांना दिसतात. कपाशीच्या लागवडीसाठी केवळ बीटी बियाण्यांचा वापर करुन चालत नाही. त्यासाठी शेतकर्‍यांनी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जळगाव कृषी विभागाचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.
 
 
भूलथापांना बळी पडू नका
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच कृषी केंद्रावर बियाण्यांच्या विक्रीला सुरुवात होते. बाजारात अद्यापही बीटी बियाणे उपलब्ध झालेले नाही. विविध कंपन्या शेतकर्‍यांना आकर्षित करुन कपाशीच्या उत्पन्नात वाढ होईल असू सांगून शेतकर्‍यांची फसवणूक करतात. अशावेळी शेतकर्‍यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता कृषी विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती जाणून घ्यावी. कुठलीही बियाणे खरेदी करतांना परवानाधारक कृषी केंद्र संचालकाकडून पक्क्या बिलाची मागणी करावी. त्यामुळे शेतकर्‍यांच्या होणार्‍या फसवणुकीला आळा बसण्यास मदत होईल.
खोलवर नांगरटीची गरज
जिल्ह्यात खरीपाचे ५३ टक्के प्रमाण आहे. कपाशीचे पीक चांगले आणि दर्जेदार राहण्यासाठी काळजी घेतल्यास ते साध्य होऊ शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी गेल्या वर्षाची पराटी, अवशेष गोळा करुन ते तात्काळ नष्ट करावेे. गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात खंड पडतो. त्यादृष्टीने खोलवर नांगरटी करुन अवजारांचा वापर क्रमप्राप्त ठरतो. तेव्हाच कपाशीचे पीक दमदार येण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
२५ मे नंतर लागवड करा
जिल्ह्यातील कपाशीच्या लागवडीच्या क्षेत्रातर्ंगंत पाहणी केल्यावर शेतकरी कपाशीची लागवड करतात. अशावेळी शेतकर्‍यांनी सावध पवित्रा उचलून २५ मे नंतरच पूर्व हंगामी कपाशीची लागवड करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सविस्तर माहिती घेऊन दक्षता घ्यावी.
@@AUTHORINFO_V1@@