पुढील महिन्यात होणार तिसऱ्या आघाडीची घोषणा ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |


हैदराबाद :
देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चचा विषय बनत निघालेल्या 'तिसऱ्या आघाडी'ची येत्या महिन्यामध्ये घोषणा करण्यात येणार असल्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे. लवकरच द्रमुक पक्षाचे सचिव एम. के. स्टालिन यांची भेट घेणार असून लवकरच तिसरी आघाडी देशात उभी राहणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसवाल्यांनी आता सावध राहावे, अशा इशाराही राव यांनी दिला आहे.

हैदराबादमधील एका कार्यक्रमामध्ये आज राव यांनी याविषयी घोषणा केली आहे. आपल्या भाषणामध्ये त्यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका करत, देशाला आता प्रामाणिक लोकांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. कॉंग्रेसने गेल्या अनेक वर्षांमध्ये फक्त स्वतःची घरे भरली तर भाजप फक्त सत्तेसाठी राजकारण असल्याही टीका त्यांनी केली. तसेच सध्या दक्षिण भारतामध्ये कावेरी मुद्यावरून नवे राजकारण भाजपने सुरु केले असून सामन्य जनतेला पाण्यापासून देखील लोक वंचित ठेवत आहे. त्यामुळे लवकरच स्टालिन यांची भेट घेऊन तिसऱ्या आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

येत्या २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राव आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या पुढाकाराने देशात एक संभाव्य तिसरा आघाडी सध्या उदयाला येत आहे. यामध्ये ममता यांचा तृणमूल, राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. तसेच देशातील काही विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न या दोघांकडून केला जात आहे. परंतु अजून तरी यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे चित्र दिसत नाही. परंतु राव यांनी आज केलेल्या घोषणेमुळे ही तिसरी आघाडी नेमकी कशी असेल ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@