खासगी वाहन चालकांच्या भाडेवाढला बसणार चाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |

खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा सरकारचा निर्णय

एसटीच्या दरापेक्षा फक्त दीड पट दर आकारता येणार



मुंबई : सुट्ट्यांमध्ये भरमसाठ भाडेवाढ करून खासगी वाहन चालकांकडून करण्यात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या पिळवणूकीला आता चाप बसणार आहे. कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर ठरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या भाडेदरानुसारच खासगी वाहन चालकांना भाडे आकारात येणार आहे, अन्यथा त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

याचबरोबर खासगी वाहन चालकांच्या देखील हिताचा विचार करता, खासगी वाहन चालकांना एसटीच्या दरापेक्षा फक्त दीड टक्केच अधिकचे भाडे आकारता येईल, असे देखील रावते यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे खासगी वाहन चालकांचा देखील फायदा होईल आणि सामान्य नागरिकांची देखील होणारी पिळवणूक रोखली जाईल. त्यामुळे यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींना मंजुरी देऊन याविषयी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देखील रावते यांनी आज सांगितले.



उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, गणेशोत्सव, होळी, नाताळ अशा गर्दीच्या हंगामाच्या वेळी खासगी वाहन चालकांकडून अवाजवी भाडेवाढ करून सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. ऐनवेळी नाईलाज असल्यामुळे नागरिकांना देखील ही भाडेवाढ मान्य करावी लागते. परंतु यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होता. गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे खासगी वाहन चालकांनी आपले दर गगनाला भिडवले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक झाली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचा नक्कीच सामान्य नागरिकांना फायदा होईल, यात शंका नाही.
@@AUTHORINFO_V1@@