पंतप्रधान चीनला जाब विचारणार का ? : रणदीपसिंह सुरजेवाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  चीनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोकलाम मुद्द्यावरून चीनला जाब विचारणार आहेत का, असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंद सुरजेवाला यांनी आज उपस्थित केला. भारत चीनच्या कारवायांना कठोर उत्तर देण्यास असमर्थ आहे, असा आरोप काँग्रेसने यावेळी केला.
चीन आणि भारत यांच्यात डोकलाम या विषयामुळे वाढलेल्या तणावाकारणाने पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
 
 
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची वुहान येथे भेट घेताना मोदी यांनी भारताच्या धोरणात्मक हितसंबंधांना संरक्षण देण्याबद्दल आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेवर परिणाम करणाऱ्या डोकलाम मुद्द्यावर त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले का? असा प्रश्न सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.
या महिन्याच्या सुरुवातीला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या चीनच्या दौऱ्यावर होत्या. मात्र या दोन्ही मंत्र्यांनी डोकलाम प्रश्नावर चर्चा केली नाही. त्यावरूनही सुरजेवाला यांनी टीका केली आहे.
या उलट सुषमा स्वराज यांनी कैलास मानसरोवर यात्रा आता पुन्हा एकदा आसाममार्गे हेवू शकेल असे या भेटीत सांगितले होते. डोकलाम वादामुळे यात्रेच्या या मार्गावर बंदी घालण्यात आली होती, मात्र आता या मार्गावरुन यात्रा पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे, असे स्वराज यांनी सांगितले. त्यामुळे डोकलाम वादामुळे ताणले गेलेले संबंध आता सुरळीत होत आहेत का? अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र सुरजेवाला यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. वुहान शहरात दोन्ही नेत्यांची भेट झाली असून या दोन्ही नेत्यांमध्ये एकूण सहा बैठका होणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@