चीनमधील वुहान शहरात नरेंद्र मोदी यांचे स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून दोन दिवसीय चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. काल त्यांचे औपचारिक पद्धतीने वुहान शहराच्या विमानतळावर स्वागत करण्यात आले. वुहान शहरातील भारतीय वंशाचे विद्यार्थी देखील त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होते. दोन दिवसाच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आज औपचारिक बैठक करतील.
 
 
 
 
 
या दोन दिवसीय दौऱ्यात भारत आणि चीनचे संबंध घट्ट होण्यास मदत मिळणार आहे. धोरणात्मक आणि दीर्घकालीन संबंध या विषयावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असे सांगितले जात आहे. भारत आणि चीनचे संबंध जरा विस्कटलेले असले तरी देखील जागतिक स्तरावर हे दोन्ही देश आपली भक्कम छाप सोडतात. त्यामुळे या दोन्ही देशांचे देखील संबंध बऱ्याच प्रमाणात सुधारावे या दृष्टीने ही बैठक होणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@