भारत-चीन अर्थव्यवस्थेमुळे जग प्रभावित : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |


वूहान : भारत-चीन या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने विकसित होत असून यामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या विकासासाठी आपापसातील संबंध चांगली राहणे अत्यंत गरजेचे आहे' असे वक्तव्य भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. चीनच्या आपल्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ते बोलत होते. यावेळी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे देखील याठिकाणी उपस्थित होते.
'संपूर्ण जगातील जवळपास ४० टक्के लोकसंख्या ही भारत आणि चीन या दोन देशांमध्ये राहत आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध देखील अत्यंत उत्तम राहिलेले आहेत. भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेने जगाला कायम प्रभावित केल्याची नोंद इतिहासामध्ये आढळते. त्यामुळे जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी या दोन्ही देशांमधील संबंध दृढ राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. तसेच दोन्ही देशांनी आपापले परस्पर मतभेद विसरून आपापसातील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला पाहिजे, असे देखील ते यावेळी म्हणाले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देखील आपल्या भाषणामध्ये भारत आणि चीन यांच्यातील मैत्री संबंधांवर प्रकाश टाकला. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अजून प्रयत्न केले पाहिजे आणि चीन यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास तयार आहे, असे देखील शी यांनी यावेळी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@