शहराप्रती प्रत्येक नागरिकाचे दायित्व - रवींद्रकुमार सिंगल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |





नाशिक : २९ व्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला सीबीएसई रस्ता सुरक्षा सप्ताह पोलिसांच्या सहकार्याने साजरा करत आहेत. रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे प्रबोधन डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट सभागृहात नाशिक शहराचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह नितीन गर्गे, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, शाळेच्या मुख्याध्यापिका लीना चक्रवर्ती हे उपस्थित होते. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सामूहिक गीत आणि वेगवेगळ्या वेशभूषा सादर करत जवळपास हजार लोकांचे प्रबोधन गेल्या तीन दिवसांत केले आहे. अशा प्रकारचे प्रबोधन संपूर्ण आठवडाभर चालू असणार आहे.

पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘’नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये जाणवणारी तफावत आणि नकारात्मक भावना दूर करण्यासाठी परस्परांच्या सहकार्याने अशा प्रकारच्या सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. विद्यार्थी हे छोटा पोलीस मित्र असून त्यांच्या साहाय्याने पालकांपर्यंत आणि अप्रत्यक्षरित्या समाजापर्यंत सहजरित्या पोहोचता येते. त्यातून रस्ता सुरक्षा विषयातील जनजागृती घराघरापर्यंत पोहोचू शकते. शहराप्रती प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे. या दायित्वाचा भाग म्हणून प्रत्येकाने नियम, कायदा याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. भोसलामध्ये खेळाच्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक वातावरण असून त्याचा सर्वांनी अधिकाधिक उपयोग करून घ्यावा. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत होणार्‍या कार्यक्रमाद्वारे शहराचा आणि नागरिकांचा नियम आणि कायदा पाळण्या संदर्भात सकारात्मक मनस्थिती तयार होईल, अशी अपेक्षा आहे.’’
@@AUTHORINFO_V1@@