गरोदर महिलांना पाच हजार मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |




प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत



मुंबई : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना पहिल्या बाळासाठी पाच हजार मिळणार असून ही रक्कम तीन टप्यात दिली जाईल.प्रथमच प्रसूत झालेल्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे. बीपीएल धारक आणि ज्या महिलांना इतर लाभ मिळाले नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी पदमजा केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त सुनील धामणे उपस्थित होते.

प्रधानमंत्री मातृ वंदना प्रधानमंत्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली मुंबईत ही योजना मुंबई महानगर पालिकेअंतर्गत राबविण्यात येत आहे. ७ एप्रिल रोजी या योजनेबाबत मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षण घेण्यात आले असून सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण विभागानुसार करण्यात येत आहे. असे केसकर म्हणाल्या.

या योजनेनुसार १ जानेवारी २०१७ रोजी आणि त्यांनतर ज्या माता गरोदर होत्या किंवा प्रसूत झाल्या असतील. त्यांना या योजनेअंतर्गत पाच हजार मिळणार आहेत. तीन हप्त्यांमध्ये हा लाभ मिळणार असून तो पहिल्या जिवंत बाळालाच दिला जाणार आहे. तर पहिल्या दोन हप्त्यासाठी लाभार्थी महिलेच्या व तिच्या पतीच्या आधारकार्डाची आवश्यकता नसून केवळ कोअर बँकिंग अंतर्गत बँकेचा लाभार्थीचा खाते क्रमांक आवश्यक आहे मात्र तिसऱ्या हप्त्यासाठी आधारकार्डाची आवश्यकता आहे. असे माहिती त्यांनी सांगितली. तसेच या योजनेचा दावा मासिकपाळीच्या दिनांकानंतर ७३० दिवसात करणे गरजेचे आहेत. जर शेवटच्या मासिक पाळीची नोंद एमसीपी कार्डमध्ये केली नसल्यास लाभार्थी बाळाच्या जन्मानंतर ४६० दिवसांत दावा करू शकतो असेही त्यांनी सांगितले.
रक्कम थेट लाभार्त्याच्या खात्यात

योजनेअंर्तगत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर (एएनएम) सोपवली आहे. अर्ज भरलेली माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र यांच्यामार्फत पडताळणी करुन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. तसेच पालिकेच्या संकेत स्थळावरुन ही याबाबत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे केसकर म्हणाल्या. ऑनलाईन पध्दतीने राज्यसरकार लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@