ब्रिटेनच्या राजवाड्यात आणखी एक 'राजपाऊल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |


लंडन :
ब्रिटेनच्या राजकुटुंबामध्ये आज आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ब्रिटेनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि कॅथरीन यांना तिसरे अपत्य झाले असून 'लुईस' असे या बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. या बाळाच्या जन्मानिमित्त ब्रिटेनमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात असून राजकुटुंबावर सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला जाऊ लागला आहे.

आज दुपारी राजकुटुंबाकडून या बाळाच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच बाळाचे पिता प्रिन्स विल्यम आणि आई कॅथरीन हे बाळाला घेऊन पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी तान्ह्या लुईसला कॅथरीन यांनी आपल्या हातात घेतले होते. ब्रिटेनच्या जनतेनी देखील राजपरिवारातील या नव्या पाहुण्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच त्याची पहिली छबी आपापल्या कॅमेऱ्यांमध्ये टिपून घेतली.


प्रिन्स विल्यम यांचे हे तिसरे अपत्य असून दुसऱ्यांदा त्यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले आहे. या अगोदर विल्यम आणि कॅथरीन या जोडीला प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लट अशी दोन अपत्य आहेत. प्रिन्स जॉर्जचा जन्म हा २०१३ मध्ये तर प्रिन्सेस शार्लटचा जन्म २०१५ मध्ये झाला होता.
@@AUTHORINFO_V1@@