मुंबई विद्यापीठाचे नवीन कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |

 
 
सायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
 
 
 
गेल्यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी डॉ संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार साभाळत होते मात्र या पदावर कुणाला नियुक्त करण्यात येणार याविषयी चर्चा करण्यात येत होती, अखेर आज या पदावर पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. पेडणेकर वयाची ६५ वर्षे पूर्ण करे पर्यंत किंवा कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ५ वर्षांपर्यंत या पदाचा कार्यभार सांभाळतील.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ. श्यामलाल सोनी, संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड व भूषण गगराणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको हे समितीचे अन्य सदस्य होते.
@@AUTHORINFO_V1@@