महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : “आपलेच सीड- आपलेच फीड” ही संकल्पना राबवून महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे, यासाठी विभागाने नियोजनबद्ध योजना आखावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मत्स्यवयवसाय विकासासंदर्भात राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ श्यामकूळे, पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, आयुक्त पशुसंवर्धन अरूण विधळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
राज्यात नीलक्रांती आणायची असेल तर “आपलेच सीड- आपलेच फीड” ही संकल्पना वेगाने राबविणे, त्यासाठीच्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करणे ही अगत्याची बाब आहे, असे सांगून अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात मत्स्यव्यवसायाला चालना देतांना या क्षेत्रातील योजना, योजनांची गती आणि नियोजन या सर्वच क्षेत्रात मिशनमोड स्वरूपात काम होण्याची गरज आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. वित्त विभाग पूर्ण ताकदीने या विभागाच्या मागे उभा राहील. विभागाने काही कालबाह्य योजनांमध्ये बदल करण्याची, काहीचे नियम, निकष आणि अनुदानाचे स्वरूप बदलण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
महाराष्ट्राला ७२० कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. राज्यात विविध विभागांतर्गत शेततळे निर्माण होत आहेत. जलसंपदा प्रकल्पांमध्ये, तलावांमध्ये, नद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मत्स्यत्पोदनाला वाव आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत मासेमारी केंद्रे अत्याधुनिक करण्याचे आपले नियोजन आहे. काम सुरु ही झाले आहे. राज्यातील ही क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्रात काम करणाऱ्या परंपरागत तसेच रोजगार म्हणून या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या लोकांचे हित लक्षात घेऊन योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी व्हावी असेही ते म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@