१० हजार रुपयांची लाच स्विकारतांना सहाय्यक अभियंता अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |
जळगाव, २७ एप्रिल :
नविन विज जोडणीसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या सहाय्यक अभियंता राकेश लक्ष्मण भंगाळे यांना ऍन्टी करप्शन ब्युरो जळगावच्या टिमने रंगेहात ताब्यात घेतले.
 
 
तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना नविन विज जोडणी घ्यावयाची होती. नविन विज कनेक्शन देण्यासाठी म.रा.वि.वि.कं.लि. थोरगव्हाण ता.रावेर येथील सहाय्यक अभियंता राकेश लक्ष्मण भंगाळे यांनी तक्रारदारास १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी २७ रोजी केली. याबाबत तक्रारदाराने ऍन्टी करप्शन ब्युरो जळगावला तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचून भंगाळे यांना १० लाखांची लाच घेतांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी लाच प्रतिबंधक विभागा उपधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@