शिक्षकांने घेतले विद्यार्थ्याला दत्तक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |

प्रदिप साखरे यांचा प्रेरणादायी ऊपक्रम

 
 
भुसावळ, २७ एप्रिल :
भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कुलचे क्रीडा शिक्षक प्रदीप साखरे यांनी आर्थिक दुष्ट्या दुर्बल आणि अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना यामुळे पुढे जाण्यास मदत होईल. याप्रमाणे अन्य शिक्षकांनीही प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांनी व्यक्त करुण या कैतुक केले.
 
 
सलोनी झिलपिले, रोहित भालेराव, मोहित भालेराव या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साखरे यांनी दत्तक घेतले. यात सलोनी झिलपिले हिचा तीची आई धुणी-भांडी करून सांभाळ करते तर भालेराव हे दोघे जुळे भाऊ हिच्या आजि-आजोबा मोलमजुरी करुन सांभाळ करतात. इ. ५ वी ते १० वीपर्यंतचा शैक्षणिक खर्च ते स्वतः करणार आहे.
 
 
गटशिक्षणाधिकारी धिमते यांच्या हस्ते या दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी यांनी केलेल्या आवहानामुळे मुख्याध्यापकांसह इतर शिक्षकांनी ही यापासून प्रेरणा घेऊन अनाथ मुले तसेच गरीब, हातमजूर पालकांच्या मुलांना दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे. अशा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी म्युनिसिपल हायस्कुलच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.
 
 
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी. वाय. सोनवणे, पर्यवेक्षक के. एम. चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिमा भारंबे तर आभार प्रगती मेने यांनी मानले.
 
 
दत्तक विद्यार्थ्यांंचा इयत्ता १० वीपर्यंतसाठी चा शैक्षणिक खर्च करणार आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी २१ विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहे. शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य दिल्याने विद्यार्थी आनंदी आहे. त्यांच्या प्रतिसादाने आनंद वाटला.
- प्रदीप साखरे
 
@@AUTHORINFO_V1@@