छत्तीसगडमध्ये सात नाक्षावाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
छत्तीसगड : आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर भागात सुरक्षा रक्षकांना सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून छत्तीसगडमधील महत्वाच्या भागात नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली जात होती. या शोध मोहिमेदरम्यान आज सुरक्षा रक्षकांना सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे. 
 
 
 
छत्तीसगड आणि तेलंगणा यांच्या सीमारेषेवर ही चकमक झाली असून याच भागामध्ये या नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तसेच काल छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये आयटीबीपी आणि पोलिसांपुढे तब्बल ६० नक्षलवाद्यांनी आपले शस्त्र सोडले असून त्यांनी माघार घेतली आहे. आता हळूहळू स्थानिक नागरिक देखील नक्षलवाद्यांना साथ देत नसल्याने त्यांना माघार घेण्याशिवाय पर्याय नसल्याने नक्षलवादी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करत आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@