जिल्ह्यात १५८ कोटीची विद्युतीकरणाची कामे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |

खा.ए.टी.नाना पाटील यांचे प्रतिपादन

 
 
जळगाव :
केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास आणि दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून जळगाव जिल्ह्यात १५८ कोटी रुपयांची विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेस दर्जेदार विद्युत सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन खा.ए.टी.नाना पाटील यांनी केले.
 
 
शहरात ३३/११ के.व्ही मेहरुण उपकेंद्रात आयोजित १० एम.व्ही.ए. क्षमतेच्या रोहित्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. सुरेश(राजुमामा)भोळे, मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, माजी महापौर सदाशिव ढेकळे, नगरसेवक अनिल देशमुख, राहुल वाघ, जीवन अत्तरदे, धिरज सोनवणे, प्रशांत नाईक, भूषण सोनवणे, इकबाल पिरजादे, कार्यकारी अभियंता संजय तडवी आदी होते. खा.ए.टी.नाना पाटील यांच्या प्रयत्नामुळे जळगाव जिल्ह्यात विद्युतीकरणाची कामे हाती घेतली आहेत.
 
शहरात २९ कोटीची विद्युतीकरणाची कामे सुरु आहेत. मेहरुण उपकेंद्रातील रुपये २ कोटी निधी खर्च करुन झालेल्या रोहित्राच्या क्षमता वृध्दीमुळे तांबापुरा, सिंधी कॉलनी, एकनाथ नगर, शांतीनारायण, महाजन नगर, हनुमान नगर, मेहरुण या परिसरातील २२ हजार नागरिकांचा कमी वीज दाबाचा आणि वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रश्न सुटणास मदत होणार असल्याचे मत आ.सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.
 
 
जनसामान्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना
केंद्र सरकारतर्फे जनसामान्यांच्या हितासाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. उज्ज्वला योजनेतून महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी गॅस जोडणी वाटप, सौभाग्य योजनेतून गरीबांना मोफत वीज जोडणी आदींचा उल्लेख खा.ए.टी.पाटील यांनी केला.
 
@@AUTHORINFO_V1@@