विरोधी पक्ष लालूच दाखवून निवडणुका जिंकतात : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
नवी दिल्ली : आजपर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्ष जनतेला मोठ-मोठ्या स्वप्नांची लालूच दाखवून निवडणुका जिंकत आलेले आहे असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज नवी दिल्ली येथून ‘नमो अॅप’च्या माध्यमातून कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार आणि आमदार यांच्याशी संवाद साधत असतांना नरेंद्र मोदी यांनी वरील मत व्यक्त केले. काँग्रेसने आजपर्यंत जनतेला लालूच दाखवून निवडणुका जिंकल्या असून निवडणुका झाल्यावर काँग्रेसने एकाही कामाचा हिशोब दिला नाही असा आरोप यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. 
 
 
 
 
 
विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यास काँग्रेस नेहमीच कचरतो. जात, पंथ, समाज, मागासवर्गीय आणि उच्च वर्ग यांच्यात तेढ निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेहमीच करीत असतो. आम्हाला जनतेचे मन आणि विश्वास जिंकायचा आहे. जनतेला अंधारात ठेवून आम्ही सरकार चालवू शकत नाही असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 
 
 
 
कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार नसून देखील केंद्रातून आम्ही कर्नाटकला विकास कामांसाठी पैसा पाठवला. निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही हे सगळे केले नसून तेथील तरुणांना नवे मार्ग उपलब्ध होण्यासाठी हा सगळा पैसा आम्ही लावला अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
काँग्रेसच्या काळात कर्नाटकमध्ये केवळ ९५० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले मात्र भाजपच्या काळात केंद्राकडून कर्नाटकात १७५० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी काँग्रेसने त्यांच्या काळात केवळ ८,७०० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र भाजपने २७००० कोटी रुपये मागील चार वर्षांत कर्नाटकसाठी मंजूर केले हा फरक नरेंद्र मोदी यांनी यावेळी समजावून सांगितला. 
 
@@AUTHORINFO_V1@@