जैन सोशल ग्रुप वर अवार्डचा पाऊस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 
 
जैन सोशल ग्रुप वर  अवार्डचा पाऊस
भुसावळ, 26 एप्रिल
जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजन अंतर्गत 5 झोन असून नुकतेच सातारा येथे झालेल्या वार्षीक समारंभात 22 अवार्ड क्षेत्र विभागाला देण्यात आल्याने अवार्डचा पाऊस झाला आहे.
 
 
महाराष्ट्र रिझन अंतर्गत पाच झोन असून औरंगाबाद व मालेगाव झोनला सर्वोेेत्कृष्ट म्हणून गौरविण्यात आले.या समारंभात औरंगाबाद विभागास 6, मालेगाव विभागास 13, धुळे विभागास 2 व अमळनेर विभागास 1 असे अवार्ड देण्यात आले.ही यशाची मालिका प्राप्त करण्यासाठी साधार्मिक कमेटी चेअरमन नेमीचंद मोदी, झोनचे प्रमुख गौतम चोरडीया, सचिव बीपीन पहाडे, राजेंद्र भंडारी, सुनिल सिसोदिया, प्रीतेश ताथेड, सचिन शहा, संदिप शहा, पंकजा वढेरा, गौतम मेहता,हेमंत मोदी, हरीष चोरडीया, पुनम कोचर, संदीप भंडारी, देवेंद्र निमानी यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांच्या मेहनत कामी आली आहे. त्यांना शरद शहा, महावीर पारेख, प्रविण चोपडा, हसमुख जैन, विजय कोठारी यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी गौतम चोरडीयायांची अगामी वर्षात ब्लडडोनेशन कमेटी चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली. मिळालेल्या यशाबाबत भुसावळचे नूतन अध्यक्ष ललीत गोठी, माजी अध्यक्ष देवेंद्र निमानी, प्रशांत कोटेचा, डी.एम.ललवाणी, अजय जैन, रुपेश जैन, युवा फोरम अध्यक्ष अक्षय चोरडीया, राजेश बाफना, जे.बी.कोटेचा यांनी कौतुक केले.
@@AUTHORINFO_V1@@