'सरकारला आपल्या बाजूचे न्यायाधीश हवेत' : कपिल सिब्बल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

लोया प्रकरणी भाजप आणि संघावर पुन्हा एकदा टीका

न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांना  एकत्र येण्याचे आवाहन 



 
नवी दिल्ली : 'संपूर्ण देशामध्ये न्यायाधीशांच्या अनेक जागा रिक्त असताना देखील सरकार त्याठिकाणी नव्या नियुक्त्या करत नाही, कारण सरकारला आपल्या बाजूने निकाल देणारे न्यायाधीश पाहिजेत' अशी टीका कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते. तसेच न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यासाठी आता न्यायपालिकेत घटकांनी देखील एकत्र यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

संपूर्ण देशात न्यायपालिकेच्या एकूण ४१० जागा रिक्त आहेत. परंतु त्यावर नियुक्त्या मात्र सरकारकडून केल्या जात नाही. सरकार आपल्या मर्जीतील लोकांनाच यापदी नियुक्त करू इच्छिते कारण त्यांना आपल्या बाजूने निकाल देणारे न्यायाधीश हवे आहेत. न्यायपालिकेत कार्यरत असलेल्या न्यायाधीशांना आणि वकिलांना देखील याविषयी माहिती आहे. पण सरकारच्या दडपशाहीविरोधात एकत्र येण्याचे धाडस ते करत नाहीत, परंतु देशाच्या न्यायापालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सर्वांनी देखील आता एकत्र आले पाहिजे, असे आवाहन सिब्बल यांनी यावेळी केले.

याचबरोबर जस्टीस लोया प्रकरणी भाजप आणि रा.स्व.संघ यांच्यावर दोषारोप देखील त्यांनी यावेळी केला. जस्टीस लोया यांच्या प्रकरणाची चौकशी होऊ नये तसेच हे आदेश स्वतः सर्वोच्च न्यायालयाकडूनच यावेत, या उद्देशाने संघाने आपल्या विश्वासातील सुरज लोलगे नव्याचा स्वयंसेवकाला हाताशी धरून हे सर्व प्रकरण उभे केले, असा आरोप सिब्बल यांनी या बैठकीत केला.

कपिल सिब्बल यांची पत्रकार परिषद :


@@AUTHORINFO_V1@@