भुयारी गटार योजनेचे काम महिनाभरात होणार सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

पहिल्या टप्प्यात १३७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

 
 
जळगाव :
अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ आता शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांनादेखील महिनाभरात सुरुवात होणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतर मनपाकडून गुरुवारी १३७ कोटी १० लाख रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे.
 
 
भुयारी गटार योजना १४६.६४ कोटींची असून, पहिल्या टप्प्यात १३७ कोटींच्या निधीतून ही कामे होणार आहेत. साधारणपणे जून महिन्यात हे काम सुरु होण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला असून, त्यातून पाणीपुरवठा योजनेच्या कामांना सुरवात देखील झाली आहे. महापालिकेने शासनाला सादर केलेल्या पाणीपुरवठा योजनेचा ४०० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्वीकारून मनपाचा अमृतमध्ये समावेश केला. याच योजनेतून भुयारी गटारींचे कामे देखील होणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीमुळे जळगावात पुन्हा एकदा विकास होत आहे.
 
१३१ किमीची टाकली जाईल पाईपलाईन
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरात १३१.७९ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. तसेच उच्च दाबाची मुख्य वाहिनी १५० मीटरची राहणार आहे. यासह ४८ एमएलडीचे मलनिस्सारण केंद्र देखील तयार करण्यात येणार आहे. या योजनेतून ४० हजार प्रॉपर्टी कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@