पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावकरी एकवटले, श्रमदानात शेकडोंचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

 
पारोळा :
तालुक्यातील वाघरे, चोरवड येथे अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर याच्या हस्ते श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः कुदळ फावडा घेऊन तबबल दोन तास श्रमदान केले. त्याच्या कर्तव्यदक्ष कामगिरीने हिरीरीने सहभाग नोंदवून श्रमदान केल्याने गावकरी प्रभावित झाले.
 
 
गावातील नागरिकामांध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला.त्याच्या समवेत प्राताधिकारी विजयानंद शर्मा,तहसीलदार वंदना खरमाडे,नायब तहसिलदार पंकज पाटील, एन झेड वंजारी,तालुक कृषी अधिकारी,एस पी तवर,पोलीस निरीक्षक विलास सोनवणे,व इतरत्र प्रशासकीय अधिकारी उपस्तीत होते.
 
 
पाणी फाउंडेशन ही महाराष्ट्र राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली नानफा तत्वावर काम करणारी संस्था आहे. पानी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ (दिग्दर्शक: सत्यमेव जयते) आहेत. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर अशा या दोन तालुक्याची निवड करण्यात आली असून त्यात पारोळा तालुक्यातील ५० गावाचा सहभाग आहे. त्यात श्रमदानासाठी वाटर कप स्पर्धा मध्ये ३० गावाचा समावेश आहे. त्यात पारोळा अमळनेर पाणी फाऊंडेशन समनव्यक निलेश राणे, दीपक सैदाने परिश्रम घेत आहेत.
 
वाटर कप स्पर्धेत ५० गावे सहभागी...
शेळावे बु. दगडी सबगव्हान, धुळपिंप्री, कराडी, विटनेर, आडगाव, चोरवड, टेहू, हिरापूर, बाहुटे, कोळपिंप्री, भिलाली, कांकराज, हनुमंतखेडे, जोगलखेड, शिरसोदे, खेडीडोक, लोणी, सवखेड, मोढळे प्र.अ., वडगाव प्रा.अ., उदिरखेडे, सारवे, रत्नापिंप्री, पाळासखेडे, मेहु या गावाचा समावेश आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@