ग्राहकांना कायद्याच्या जनजागृतीसाठी उपक्रमांची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

कंझुमर मेगा शिबिरात राहूल जाधव यांची माहिती

 
जळगाव :
ग्राहक संरक्षण कायद्याची जनजागृती होवून त्यांना अधिकारांसह जबाबदारीची जाणीव झाल्यास फसवणूक होणार नाही. त्यासाठी ग्राहक मार्गदर्शन उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी केले.
 
 
येथील अल्पबचत भवनात जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईच्या भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्थेतेर्फे आयोजित कंझुमर मेगा शिबिरात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे ग्राहक सल्लागार सदस्य विक्रांत जिंदाल, वित्तीय सल्लागार नंदकुमार मेनोन उपस्थित होते.
 
 
आपली सुरक्षितता आपल्याच हातात आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रमाणित किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक किंमत देवू नये. वस्तु खराब निघाल्यास वस्तुच्या आवेष्ठनावर दिलेल्या कस्टमर केअर क्रमाकांशी संपर्क साधावा. मात्र, ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी तसेच त्यांना मोफत मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी संस्थेने १८००२२२२६२ हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. तसेच ारह.हशश्रश्रिळपशसारळश्र.लेा या ईमेलवरही ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातात. यावर संपर्क साधून ग्राहक आपल्या तक्रारींचे मोफत निराकरण कसे करावयाचे त्याचे मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्थेचे ग्राहक सल्लागार सदस्य विक्रांत जिंदाल यांनी दिली.
 
 
ग्राहकांची होणारी वित्तीय फसवणूक कशी टाळावी. त्याकरीता काय काळजी घेतली पाहिजे, फसवणूक झाल्यास कोणाशी संपर्क साधावा यावर संस्थेचे वित्तीय सल्लागार नंदकुमार मेनोन यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला ग्राहक संरक्षक परिषदेचे शासकीय, अशासकीय सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.
 
कायद्याचे ज्ञान आवश्यक
जगातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. शासकीय कार्यालतही एक सेवा पुरविणारी संस्था आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हे सर्वात मोठे शस्त्र प्रत्येकाच्या हाती आले आहे. त्याचा वापर प्रत्येकाने सुरक्षितपणे करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रमाणात फसवणूक होवू शकते. त्यासाठी नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान आवश्यक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@