राज्य स्थापनेपासून उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

  
 
 
मुंबई : विक्रीकर विभाग हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग असून राज्य स्थापनेच्या पहिल्या वर्षीच्या ३० कोटी रुपयांच्या कर महसूलात जमा झाला होता. तर या वर्षाची वाढ १ लाख १५ हजार ९४० कोटी रुपयांपर्यंत झाली असून ही वाढ ३८६५ पट असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच ही बाब निश्चित कौतूकास्पद आहे आणि हे या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामाचे फलित आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
 
बुधवारी अर्थमंत्र्यांच्या हस्ते महाजीएसटी संकेतस्थळ, ऑनलाईन निर्धारणा, महाजीएसटी मोबाईल ॲप, महापीटी मोबाईल ॲप या विविध संगणकीय सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, वस्तु व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा आणि अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.
 
घरात आईचे महत्‍व हे इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा वेगळे आणि अनन्यसाधारण असते. त्याप्रमाणेच शासनाच्या सर्व विभागांमध्ये वस्तू आणि सेवा कर विभागाचे महत्त्व हे वेगळे आहे असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. कारण राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला कर महसूल सर्वाधिक प्रमाणात हा विभाग मिळवून देतो. त्यामुळे सर्व विभागांमध्ये मातृस्थानी असलेल्या वस्तू आणि सेवा कर विभागाचे काम अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले. विभागाने एक परिवार होऊन वस्तू आणि सेवा कर प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करतांना कर महसूलाचे उद्दिष्ट पूर्ण केले. आज त्यांच्या कामाचा गौरव केल्याने त्यांना एक नवी शक्ती मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
 
सर्व विभागांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध
 
जे विभाग राज्याच्या तिजोरीत पैसा देतो त्या विभागांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. तसेच आपल्या श्रमातून राज्य विकासात कर रूपाने योगदान देणाऱ्या राज्यातील व्यापारी, उद्योजक आणि करदात्यांना सहज, सुलभ आणि सरल संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे. करदात्याला कोणत्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये, त्याला नियमाप्रमाणे सहज सुलभ पद्धतीने कर भरता यावा, यासाठी एक उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विभागावर आहे. विभागाचे अधिकारी-कर्मचारी अतिशय समर्पितपणे त्यासाठी काम करत आहेत. म्हणूनच दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर संकलन करण्यात विभाग यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
 
@@AUTHORINFO_V1@@