भारत आणि मंगोलिया यांच्यात महत्त्वपूर्ण करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
मंगोलिया : परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सध्या मंगोलियाच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशात महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. सुषमा स्वराज यांनी या दौऱ्यात मंगोलियाचे पंतप्रधान यु. खुरेलसुख आणि परराष्ट्रमंत्री दाम दिन सुखबात्तर यांची मंगोलियाची राजधानी उलानबाटार येथे भेट घेतली. 
 
 
 
 
 
उर्जा, सूचन व प्रसारण, हवामानशास्त्र, पायाभूत सुविधा आणि सेवा अशा वेगवेगळ्या विषयांच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि सुविधांचे आदानप्रदान होण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. सुषमा स्वराज या ४२ वर्षांमध्ये मंगोलिया देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या पहिल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. 
 
 
 
 
 
या दौऱ्यात 'भारत - मंगोलिया संयुक्त परामर्श बैठक’ देखील पार पडली. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व सुषमा स्वराज यांनी केले असून या बैठकीचे सह-अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. भारत आणि मंगोलिया या दोन्ही देशांमध्ये आध्यात्मिक संबंध देखील वाढावेत अशी इच्छा यावेळी त्यांनी प्रकट केली. यावेळी संरक्षण विषयावर देखील महत्त्वपूर्ण चर्चा झाली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@