एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द होणार ; दिवाकर रावते यांची घोषणा



मुंबई : कनिष्ठ वेतन श्रेणीमध्ये काम करत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कमी वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होऊ नये, म्हणून लवकरच कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कमी वेतनावर काम करणाऱ्या आणि नव्याने महामंडळामध्ये भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

एसटी महामंडळामध्ये पूर्वी नवीन कर्मचारी भरती झाल्यानंतर त्याला सुरुवातीची ५ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. परंतु सरकारने हा कालावधी नंतर ३ वर्षावर आणला. त्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये बदल करत तो कालावधी १ वर्षावर आणला. परंतु या काळात कमी वेतनामुळे नव्या कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे समोर येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेता कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. तसेच संचालक मंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@