नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 
 

 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आज नवी दिल्ली येथील विमानतळावरून संध्याकाळी ते या दौऱ्यासाठी निघणार आहे. या दौऱ्यात ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार असून या भेटीत ते द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर हे दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. 
 
 
चीनमधील वुहान शहरात हे दोन्ही नेते भेटणार असून या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान केले जाणार आहेत. तसेच हे दोन्ही नेते एका औपचारिक बैठकीत देखील भाग घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. या दोन्ही नेत्यांमधील महत्वाचा दुवा सुषमा स्वराज या ठरल्या आहेत. 
 
 
शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी देखील नरेंद्र मोदी चीनला जाणार आहेत. या बैठकीत इतर देशांमध्ये प्रमुख नेते देखील भाग घेणार आहेत.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@