शिक्षणाबरोबरच कर्तव्याची जाणीव आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

रायसोनीतील विद्यापीठ प्रतिनिधी कार्यशाळेत दिलीप पाटील

 
जळगाव :
शिक्षण घेत असतांना फक्त विद्यार्थी म्हणून शिक्षण घेण्याची आपली जबाबदारी नाही. एक चांगला विद्यार्थी म्हणून अभ्यासासोबत समाजातील विविध समस्या सोडविण्याची देखील जबाबदारी आपल्याकडे असते. एक समाज घटक म्हणून कर्तव्यांची जाण आपल्याला हवी, असे प्रतिपादन उमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी व्यक्त केले.
 
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ प्रतिनिधींसाठी आयोजित नेतृत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी दिलीप पाटील बोलत होते.
 
 
रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल, विद्यापीठ प्रतिनिधी अध्यक्ष दिगंबर पवार, सचिव प्रियंका पाटील, प्रा. मकरंद वाठ, विद्यापीठ नियुक्त कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा. खेमराज पाटील, प्रा. वकार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
देशाच्या इतिहासात बदल करणारे सर्व नेते युवा होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांचा समावेश आहे.
 
 
२०१६ च्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन निर्णय क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा हा या कायद्याचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाज उपयुक्त नेतृत्व असायला हवे असेही दिलीप पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राज कांकरिया यांनी केले. आभार प्रा. रफिक शेख यांनी मानले. कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील विद्यापीठ प्रतिनिधी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@