बांबूमध्ये प्रचंड रोजगार संधी- सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूमध्ये प्रचंड रोजगार संधी दडल्या असल्याचे यावेळी सांगितले. या तीन ही केंद्रे सुरु करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे ही ते म्हणाले. बांबूचे मूल्यवर्धन करून बांबूपासून राखी, बांबूचे दागिणे, बांबू घरे, बांबू बाथरूम, स्वंयपाक घरातील छोट्या मोठया वस्तूंची निर्मिती, हस्तकौशल्याच्या वस्तू, बास्केट, चटई, बांबू पल्प पासून कागद निर्मिती तसेच वस्त्र निर्मिती, अपारंपाजिक उर्जा निर्मिती यासारख्या अनेक गोष्टी तयार होतात. 
 
 
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात असून त्यामाध्यमातून शेकडो महिलांना रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध झाल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
 
 
चंद्रपुरातील बांबू हॅन्डीक्राफ्ट ॲड आर्ट युनिट (भाऊ) या निर्मिती आणि सामुहिक उपयोगिता केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून विविध वस्तू बनविण्यासाठी आवश्यक असणा-या आधुनिक मशिन लावण्यात आल्या आहेत. मोठया प्रमाणात महिला बचत गटांना या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जात असून जिल्हयात चंद्रपूरनंतर विसापूर, मूल, पोंभूर्णा, जिवती, नागभिड, चिमूर या भागात सामुहिक उपयोगिता केंद्र लवकरच निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हाभर प्रशिक्षण व निर्मितीचे वातावरण निर्माण होत आहे. 
 
 
या ठिकाणी तयार होणा-या बांबूपासूनच्या विविध वस्तू विक्री क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यामार्फत वितरीत व्हाव्यात त्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अगरबत्तीच्या उद्योगासाठी चंद्रपूर हे महत्वाचे केंद्र नजिकच्या काळात बनणार असून देशात आयात होणारी अगरबत्ती हद्दपार होऊन त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये तयार झालेल्या अगरबत्तीचा वापर जनता लवकरच करेल, असे त्यांनी सांगितले. 
 
@@AUTHORINFO_V1@@