गरज पडली तर प. बंगालमध्ये फेर मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

प.बंगालच्या पंचायत निवडणुकांची निवडणूक आयोगाकडून घोषणा


१४ मे ला होणार मतदान ; गरज पडल्याच १६ फेरमतदान



कोलकत्ता :
भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय वादामुळे रखडलेल्या प.बंगालच्या पंचायत निवडणुकांना अखेरकार मुहूर्त मिळाला आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने १४ मे ही मतदानाची तारीख जाहीर केली असून १७ तारखेला मतमोजणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच गरज पडल्यास १६ तारखेला राज्यात फेरमतदान देखील घेण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या निवडणुका शांततेत पार पडणार का ? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाने आज याविषयी घोषणा केली असून याविषयीची अधिकृत सूचना जारी केली आहे. या सुचणेनुसार येत्या १४ मे ला राज्यात सर्वत्र पंचायत निवडणुकांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. तसेच १४ तारखेला कसल्याही प्रकारचा गदारोळ झाल्यास अथवा मतदान प्रक्रियेत बाधा उत्पन्न झाल्यास, येत्या १६ तारखेला सर्व बंदोबस्तामध्ये पुन्हा एकदा राज्यात फेरमतदान घेण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे व यानंतर लगेच १७ तारखेला मतमोजणी केली जाऊन निकाल जाहीर करण्यात येतील, असे आयोगाने जाहीर केले आहे.
भाजपच्या याचिकेनंतर कोलकत्ता उच्च न्यायालयाने आयोगाला सर्व बंदोबस्तामध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आयोगाने आज ही घोषणा केली आहे. खरे पाहता गेल्या ९ तारखेलाच राज्यात पंचायत निवडणुका होणार होत्या. परंतु तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करत असून उमेदवारांना निवडणूक अर्ज भरू देत नसल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच निवडणुकी दरम्यान राज्यात निमलष्करी दले तैनात करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली होती. यावर कोलकत्ता न्यायालयाने आपला निर्णय देत आयोगाला निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.
@@AUTHORINFO_V1@@