महिला वकील ते थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

देशात पहिल्यांदाच महिला वकीलाची थेट सर्वोच्च न्यायालयात निवड



नवी दिल्ली : देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी एका महिला वकीलाची न्यायाधीशा म्हणून निवड करण्यात आली आहे. इंदू मल्होत्रा असे त्यांचे नाव असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नियुक्तीला आज अंतिम मान्यता दिली आहे. त्यामुळे वकिली करत असताना थेट न्यायाधीश पदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम जोसेफ यांच्या जागी मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. कायदे मंत्रालयाने केलेल्या शिफारसीनंतर राष्ट्रपती कोविंद यांनी आज त्यांच्या नावाला मान्यता दिली. त्यामुळे येत्या शुक्रवारी त्यांचा न्यायाधीशा पदाचा शपथविधी पार पडणार असून जोसेफ यांच्याकडून त्या न्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारतील.
 
@@AUTHORINFO_V1@@