बायचुंग भुतियाची तृणमूलला 'किक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

'हामरो सिक्कीम पार्टी' या नव्या राजकीय पक्षाची घोषणा 



नवी दिल्ली : माजी फुटबॉलपटू तसेच तृणमूल कॉंग्रेसचा माजी नेता बायचुंग भुतिया याने आज आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'हामरो सिक्कीम पार्टी' असे त्याच्या पक्षाचे नाव असून लवकरच आपला पक्ष हा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

नवी दिल्लीतील 'प्रेस क्लब ऑफ इंडिया' येथे या संबंधी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये भुतियाने आपले मत मांडत, हा पक्ष सिक्कीमच्या जनतेला समर्पित असल्याचे म्हटले. सिक्कीममधील तरुण हे सध्या भरकटले असून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. त्यांचे हित त्यांना समजावून सांगितले पाहिजे आणि त्याप्रकारे त्यांनी देखील योग्य निर्णय घेऊन आपला राजकीय विकास साधला पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले. त्यामुळे हा पक्ष त्यांच्यासाठीच निर्माण करण्यात आला असून हा पक्ष सिक्कीमच्या सर्वसामान्य जनतेचा आहे, असे देखील त्याने यावेळी म्हटले.

बायचुंग भुतियाची संपूर्ण पत्रकार परिषद :




भुतियाने गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तृणमूल कॉंग्रेसला सोडचिट्टी दिली होती. दार्जिलिंगमध्ये सुरु असलेल्या गोरखालँडच्या चळवळीला पाठींबा दिल्यामुळे भुतिया आणि तृणमूलमध्ये मतभेद होत होते. त्यामुळे त्याने तृणमूलला रामराम ठोकत आपला स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याचे जाहीर केले होते. तसेच काल देखील त्याने आपल्या पत्रकार परिषदेविषयी सोशल मिडियावरून माहिती दिली होती.

भुतियाचे कालचे ट्वीट :


@@AUTHORINFO_V1@@