बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन द्यावे - राज्यपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
बांबू क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल राज्यपालांनी वनमंत्र्यांचे केले कौतुक


मुंबई : बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्यात यावे, त्यादृष्टीने राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी येथे बांबूपासून वस्तुनिर्मितीची प्रशिक्षण केंद्र सुरु करावीत अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिल्या. बांबूच्या क्षेत्रात वनविभागाने केलेल्या भरीव कामगिरी बद्दल राज्यपालांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले. राजभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह या तीन ही विद्यापीठाचे कुलगुरू, वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
 
बांबूआधारित उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी वरील तीनही विद्यापीठांमध्ये येत्या तीन महिन्यात ही केंद्रे सुरु केली जावीत असे सांगून राज्यपाल म्हणाले की, स्टार्ट अप पॉलीसीअंतर्गत बांबू आधारित रोजगार संधीची मोठ्याप्रमाणात उपलब्धता होऊ शकते. पंतप्रधानांचे देखील हेच स्वप्नं आहे. त्यामुळे बांबूपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा बाजारपेठेतील मागणी आधारित उपयोग कसा करता येऊ शकेल, याचा सविस्तर अभ्यास केला जावा. यासाठी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ, चिचपल्ली यांच्याशी चर्चा केली जावी. विद्यापीठांनी बांबू लागवडीत पुढाकार घ्यावा असेही म्हटले.
 
@@AUTHORINFO_V1@@