अंजली दमानिया यांना निनावी पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना सावधानतेचा इशारा देणारे एक निनावी पत्र मिळाले आहे. या बद्दलची माहिती स्वत: दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे.
 
या संदर्भात दमानिया यांनी ट्विट करत म्हणले आहे की, मला एक पत्र पोस्टाने मिळाले आहे. त्यामध्ये मी जर जळगावला गेले तर तीन लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे, असे लिहिण्यात आले आहे. या पत्राची प्रत जळगाव पोलीस अधिक्षकांना पाठवण्यात आल्याचेही यात लिहिले आहे. दमानिया यांनी हे पत्र पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांना पाठवले आहे.
 
 
 
 
तसेच हे पत्र दमानिया यांना त्यांच्या सांताक्रुझच्या घराच्या पत्त्यावर आले आहे. या पत्रामध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला असून ज्या तीन लोकांपासून दमानिया यांच्या जीवाला धोका आहे त्यांचे संपूर्ण नाव आणि पत्ताही देण्यात आला आहे. व या व्यक्ती तुमच्यावर हल्ला करणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@