विधीग्राह्य प्रस्तावाचा घोळ सोडविण्यासाठी पालिका आयुक्त, चिटणीस यांची संयुक्त बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |
 

 
 
मुंबई : स्थायी समितीत विधीग्राह्यतेबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी आला असता, शिवसेनेने त्यावर हरकत घेत त्याला विरोध केला. त्यावर विधीग्राह्य प्रस्तावाचा घोळ सोडविण्यासाठी पालिका आयुक्त, चिटणीस यांची संयुक्त बैठक आयोजित करुन तोडगा काढला जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.
 
सांताक्रुझ पूर्वेकडील नेहरु रोडवरील स्वागत हॉटेल ते वाकोला नदी पर्यंत पर्जन्य जलवाहिनी पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला. सदर प्रस्तावाचे पत्र आयुक्तांनी ११ एप्रिलला चिटणीस विभागाला पाठवले होते. त्यामुळे हा प्रस्ताव १८ एप्रिलच्या स्थायी समितीत मंजूरीसाठी येणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने २५ एप्रिलला प्रस्ताव आणल्याने विधीग्राह्यतेचा पेच निर्माण झाला आहे. बुधवारी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव समितीच्या पटलावर आल्याने शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरले.
 
अधिनियमानुसार ११ मे रोजी तर स्थायी समितीच्या पटलावर आल्यानंतर २४ मे पर्यंत प्रस्तावाची विधीग्राह्यता संपणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव आणण्यापूर्वी प्रशासनाने विधीग्राह्यता तपासावी. तसेच आयुक्तांकडून येणारे प्रस्ताव थेट स्थायी समितीत आणावेत, अशी सूचना समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. जाधव यांच्या सुचनेचे शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी समर्थन केले. तसेच कायदेशीर कारभाराची प्रशासनाला आठवण करुन दिली. दरम्यान, विधीग्राह्य प्रस्तावाचा घोळ सोडविण्यासाठी पालिका आयुक्त, चिटणीस यांची संयुक्त बैठक आयोजित करुन तोडगा काढला जाईल, असे समिती अध्यक्ष जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@