छत्तीसगडमधील तब्बल ६० नक्षलवादी समाजाच्या मूळ प्रवाहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर नव्या आयुष्याला सुरुवात


नारायणपूर : नक्षलवादाविरोधात भारतीय सुरक्षा दलांकडून सुरु करण्यात आलेल्या विविध प्रयत्नांना आता यश येत असल्याचे दिसत आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर तब्बल ६० नक्षलवादी आज पुन्हा एकदा समाजाच्या मुळ प्रवाहामध्ये आले आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर आणि समुपदेशनानंतर या सर्व जणांनी आपले नक्षली जीवन संपवून नव्या आयुष्याशी सुरुवात केली आहे. तसेच यासाठी पोलीसांकडून या सर्वांना काही मदतनिधी देखील देण्यात आला आहे. त्यामुळे नक्षलवादावर प्रेम आणि स्नेहाने विजय मिळवता येऊ शकतो, याचे एक अत्यंत स्फूर्तीदायक उदाहरण या निमित्ताने उभे राहिले आहे.

नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड येथे या निमित्त आज सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याध्ये हे सर्व नक्षलवादी पोलिसांना शरण आले व पुन्हा या मार्गाला कधीही न जाण्याचा संकल्प त्यांनी केला. विशेष म्हणजे हे सर्व जण आपल्या शस्त्रांबरोबर पोलिसांना शरण आले. तसेच समाजाच्या मूळ प्रवाहात पुन्हा एकदा परत येण्यासंबंधी त्यांनी इच्छा व्यक्त केली. यासाठी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने परिश्रम घेऊन तसेच त्यांचे समुपदेशन देखील केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आज बस्तरचे पोलीस अधीक्षक विवेकानंद सिन्हा, डीआयजी रतनलाल डांगी आणि आयटीबीपीचे इतर अधिकारी यांच्या समोर ते पोलिसांना शरण आलेले असल्याचे जाहीर करून त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना मदतनिधी देण्यात आला आहे.





गेल्या आठवड्याभरामध्ये भारतीय सुरक्षा दलांना नक्षलवादाविरोधात मिळालेले हे दुसरे सर्वात मोठे यश मानले जात आहे. गेल्या शनिवारी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ४० हून अधिक नक्षलवादी मारले गेले होते. त्यानंतर आज तब्बल ६० नक्षलवादी पोलिसांना शरण आले असल्यामुळे हा अत्यंत सकारत्मक बद्दल असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@