रेल्वे आणि पालिकेच्या जागा अदला बदल प्रक्रियेस सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
रेल्वे  आणि पालिकेच्या जागा अदला बदल प्रक्रियेस सुरुवात 
 
भुसावळ, 25 एप्रिल
भुसावळ शहरात वाहतुकिची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असतांना आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नांमुळे नगर परिषद व रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक होवून जागेची तबदलीकरणासाठी चर्चा करण्यात आली होती. या चर्चेची पुढील कारवाई होत असून जागा तबदली करण्याबाबत प्रस्ताव करण्याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाविस्कर यांनी मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाच्या व्यवस्थापकांना २४ रोजी  पत्र दिले .
 
 
शहरातील वाहतुकिच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी समांतर नवीन रस्त्याची निर्मिती साठी 2 एप्रिल रोजी आमदार संजय सावकारे, डिआरएम आर.के.यादव ,नगराध्यक्ष रमण भोळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल, टाउल प्लॅनींग, पोलिस व आरपीएफचे अधिकारी यांनी यांनी प्रत्यक्षस्थळांवर जावून पाहणी केली होती. यात हंबर्डीकर चौका ते लोखंडी पुलाखालील बोगद्या पर्यंत रस्ता विस्तारीकरण ,रेल्वेस्थानक ते वरणगाव रोड दरम्यान नवीन रस्ता निर्मिती , बसस्थानकाचे स्थलांतरण , लोखंडीपूलाखाली नवीन बोगद्याची निर्मिती याबाबत पाहणी करून जागा तबदलीकरणासाठी सकारत्मकता दर्शवली होती.
 
 
289 कोटी रुपयांच्या निधीतुन हंबर्डीकर चौकते लोखंडी पुलाखाली बोगद्यापर्यंतच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम होणार असून त्यात या मार्गावरील पुर्वेकडील दुकानांस दोन ते तीन मिटर मागे मागे जागा देण्यात येणार आहे. दुकानदारांनी रस्ता रुंदीकरणासाठी दिलेल्या जागेच्या दुप्पट जागा त्यांना देण्यात येणार आहे.तसेच तुटलेल्या बांधकामापोटी त्यांना 15 वर्षे मालमत्ता करातुन सुट देण्यात येणार आहे. याप्रकरणी 28 मार्च रोजी सर्वे करण्यात आला होता. हंबर्डीकर चौक ते बाजारपेठ पोलीस ठाण्यापर्यंतच्या रस्त्याचे विस्तारीकरण करून नवीन चौथ्या बोगद्याची निर्मिती होणार आहे. विस्तारीत रेल्वे स्थानक रोडला जोडणारा हा चौथा बोगदा वाहतुकिची कोंडीफोडण्यास महत्वाचे कार्य करणार आहे. वरणगाव रोडचा सध्यस्थितीमधील मार्ग एकेरी करून गार्ड लाईचा रस्ता सुरू करणे व नवीन रस्त्याची निर्मिती करून वरणगावरोडला समांतर नवीन एकेरी मार्ग तयार केला जाणार आहे. बाजारपेठ पोलिस ठाणे ते रेल्वे स्थानकापर्यंत रस्ता विस्तारीकरणासाठी रेल्वेत्यांच्या मालकिची जागा देणार आहे.
 
 
रस्ते विस्तारीकरण कामासाठी पालिकेने जुन्या इमारतीची 32 हजार चौ.फुट जागा रेल्वे विभागाला दिल्यास रेल्वे यावल रोडवरील सेंट अॅलायसेंस हायस्कूलच्या बाजूची लोहमार्ग पोलीस वसाहतीची सव्वातीन एकर जागा पालिकेला देवू शकते. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून यापुढील काळात त्यास गती मिळाल्यास पालिका व रेल्वेत सामंजस्य करार होऊन जागांची अदलाबदल करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. पालिकेच्या जुन्या कार्यालयात असलेल्या ब्रिाटीशकालीन विहिरीवरून नगरपालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त अग्निशमन यंत्रणेसाठी पाणीपुरवठा केला जाईल.
 
 
जागेच्या देवाण – घेवाण , विकास कामांच्या प्रस्तावाची सविस्तर माहिती न.पा.च्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवली जाणार आहे. कशा पध्दतीचा रस्ते व जमिनी चा विकास करावयाचा आहे. त्यात पालिकेने आपणास काय सहकार्य करावे आणि न.पा.ने कोणती जमिन उपलब्ध करून द्यावी त्याबदल्यात त्यांना कोणती जमिन उपलब्ध होईल. त्याची काय पध्दत आणि प्रक्रिया असेल याचा नकाशासह जमिनीचा कागद पत्रासह सविस्तर प्रस्ताव द्यावा. पालिका प्रशासनाकडे तांत्रीक कर्मचारी पुरेसे नसल्याने सीव्हील अभियंते उपलब्ध करून द्यावे. असे पत्र मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी डीआरएम यांना नुकतेच दिले आहे.
 
जागा अदलाबदलसाठी रेल्वे व पालिका प्रशासन प्रस्ताव देणार
न.पा.च्या सर्वसाधारण सभेत रेल्वेच्या प्रस्तावावर चर्चा होणार
वाहतुक समस्या निकाली निघणार
 
@@AUTHORINFO_V1@@