वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातील तिघे बेपत्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

शहर, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद

जळगाव :
वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये शहरातील तीन जण बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहर, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. हरवलेल्या तिघांमध्ये एका तरुणासह दोन प्रौढांचा समावेश आहे.
 
 
ऍड. पद्माकर बाबुराव दर्जी (वय ४८, रा. नवीन जोशी कॉलनी, जळगाव), भूषण युवराज पाटील (वय ४४, रा. प्रतापनगर, जळगाव) आणि शिवराम गोपाल सोनवणे (वय २४, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. ऍड. पद्माकर दर्जी आणि भूषण पाटील हे दोघेही २३ रोजी तर शिवराम सोनवणे हा जानेवारी २०१८ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बेपत्ता आहे.
 
बँकेत गेले अन् परतलेच नाही
ऍड. पद्माकर दर्जी हे २३ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वाजेदरम्यान बँकेत जातो, असे सांगून गेले होते. परंतु, ते घरी परतलेच नाहीत. याप्रकरणी त्यांच्या पत्नी नंदा दर्जी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक कोसे करत आहेत. दुसर्‍या घटनेत भूषण पाटील हे २३ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या न्यू बी.जे. मार्केटमधील स्टेशनरीच्या दुकानात जातो, असे सांगून घराबाहेर पडले होते. परंतु, ते उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचे वडील युवराज मोतीलाल पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास अल्ताफ पठाण करत आहेत.
 
शिवराम तीन महिन्यांपासून बेपत्ता
तिसर्‍या घटनेत शिवराम हा तरूण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बेपत्ता झाला आहे. तो कॅटेरिंग व्यावसायिकांना मजूर पुरवण्याचे काम करतो. कामावर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. परंतु, तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांच्या त्याच्या मोबाईलवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो ज्या-ज्या कॅटेरिंग व्यावसायिकांकडे काम करत होता; त्यांच्याकडेही संपर्क साधला. मात्र, उपयोग झाला नाही. शेवटी २४ रोजी त्याची आई निर्मला सोनवणे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल अरूण पटेल करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@