पाळधी बायपासजवळ कापसाने भरलेला ट्रक उलटला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

नऊ मजूर जखमी; खेडी-कढोली फाट्यासमोर घडला अपघात

 
 
जळगाव :
कापसाने भरलेला ट्रक उलटून नऊ मजूर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पाळधी बायपासजवळ खेडी-कढोली फाट्यासमोर घडली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमींना पाळधी ग्रामस्थांच्या मदतीने त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील मुकटी येथील एका कापूस व्यापार्‍याने जळगाव तालुक्यातील शेतकर्‍यांकडून कापूस विकत घेतला होता. हा कापूस (एमएच १८ एए १०८०) क्रमांकाच्या आयशर ट्रकने जळगावहून पारोळा येथील जिनिंगमध्ये नेण्यात येत होता. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास महामार्गावर पाळधी बायपासजवळ खेडी-कढोली फाट्यासमोर ट्रक चालक धनराज मराठे याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. ट्रकमधील कापूस इतरत्र विखुरला गेला. त्यात ट्रकवर बसलेले मजूर कापसाखाली दाबले गेले. सुदैवाने पाळधी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने वेळीच मदतीला धावले. ग्रामस्थांनी तातडीने कापसाखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
 
जखमी मजुरांची नावे अशी
या अपघातात रितेश गोकूळ मराठे (वय २२), सोमनाथ चौधरी (वय २४), समाधान अंकुश पाटील (वय ३२), प्रभु हरी भिल (२८), दिनेश देवीदास पाटील (वय २५), सुनील शिवदास सैंदाणे (वय ३५), सुरेश सोमा मोरे (वय ३५), सोमेश नामदेव चौधरी (वय २२), प्रदीप रणछोड लोहार (३५) सर्व रा. मुकटी, ता. धुळे हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
मदतीला धावले शेकडो हात
या अपघाताची माहिती मिळताच जि.प. सदस्य प्रताप पाटील यांच्यासह पाळधीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. ट्रकवरील मजूर कापसाच्या ढिगार्‍याखाली दाबले गेले होते. त्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता होती. ग्रामस्थांनी त्वरित एक जेसीबी आणले. परंतु, मदतकार्यासाठी जमलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याने जेसीबीची गरज भासली नाही. ग्रामस्थांनी काही मिनिटातच कापसाचा ढिगारा बाजूला करून त्यात दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. त्यानंतर जि.प. सदस्य प्रताप पाटील यांच्या गाडीतून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात काही मजुरांना जबर मुका मार लागला आहे तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@