उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राज्यशास्त्राच्या परिक्षेचा गोंधळ थांबता थांबेना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

अभाविपच्या पुढाकाराने परिक्षार्थींची भोजन व निवास व्यवस्था

 
जळगाव, २५ एप्रिल :
उ.म.वि.च्या परिक्षा आणि गोंधळ हे समिकरणच बनत चालले आहे. काही दिवसांपूर्वी व्दितीय वर्ष बी.ए. राज्यशास्त्राच्या विद्याथ्र्यांना चुकिची प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून मिळाली होती. त्यामुळे अभाविपच्या कार्यकत्र्यांनी सोमवाररोजी परिक्षाविभागातील विविध विषयांनाधरून कुलगुरूंना निवेदन देवून असा गोंेधळ थांबवा अशी मागणी केली. यागोंधळामुळे विद्याथ्र्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचे सांगीतले होते. परंतु यावर विद्यापीठाने बुधवाररोजी कळस गाठला.
 
२५ रोजी एम.ए.राज्यशास्त्र विषयाच्या अंतिम वर्षांच्या विद्याथ्र्यांचा अंतिम पेपर दुपारी २ ते ५ या वेळेत होता. या विषयाचे मु.जे. महाविद्यालयात ४५ परिक्षार्थी आहेत. दुपारी निर्धारीत वेळेत विद्याथ्र्यांना प्रश्नपत्रिका मिळाली. प्रश्नपत्रिकेवर विषयाचा कोड बरोबर होता परंतु प्रश्नपत्रिकेत प्रश्न मात्र अभ्यासक्रमाच्या बाहेरील हेाते. विद्याथ्र्यांनी ही बाब प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिली व परिक्षा न देण्याचा निर्णय घेतला . परंतु पर्यवेक्षकांनी त्यांना तीच प्रश्नपत्रिका सोडविण्यास सांगीतले.हा गोंधळ अभाविपच्या कार्यकत्र्यांना माहिती होताच त्यांनी परिक्षानियंत्रक ए.बी.चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यंानी र्दिगीरी व्यक्त केली. सुमारे २ तास विद्याथ्र्यांना ती प्रश्न पत्रिका सोडवावी लागली. दोन तासांनी विद्यापीठातुन हस्तलिखीत प्रश्नपत्रिका परिक्षाकेंद्रावर मेलव्दारे पाठविण्यात आली. तीची प्रत काढून ४.३० वाजेला विद्याथ्र्यांना ती वितरीत करण्यात आली.
परिक्षार्थी गोंधळात
मुळात प्रश्नपत्रिका चुकिची आली. त्यातही ती सोडवायला सांगण्यात आली. सुधारीत प्रश्नपत्रिका ४.३० वाजेला देण्यात आली. बाहेरगावाहून परिक्षेसाठी आलेले विद्यार्थी सकाळपासूनच परिक्षा केंद्रात आलेले होते. भोजन किंवा नाश्ता नसल्याने तसेच उन्हाचा तडाखा असल्याने विद्याथ्र्यांची स्थिती बिकट होती. त्यातच हा गोंधळ झाला.
४५ विद्याथ्र्यांमध्ये काही विवाहीत विद्यार्थीनी या गरोदर आहेत. त्यांची अवस्था अधिक बिकट झाली. ४.३० वाजेला सुरू झालेला पेपर ७.३० वाजेला सुटणार असल्याने बाहेरगावच्या अनेक विद्याथ्र्यांना घरी जाण्यासाठी वाहनाची सोय राहिली नाही.
 
 
चुकिची प्रश्नपत्रिका दिली गेल्यानंतर ती विद्याथ्र्यांना सोडवायला लावण्यात आली. तसेच सुधारीत प्रश्नपत्रिका दिल्या नंतर नवीन उत्तर पत्रिका देण्यात आली. यामुळे एकाच पेपर साठी दोन उत्तर पत्रिका खर्ची झाल्या.

अभाविपचे आंदोलन
गोंधळाची माहिती होताच अभाविपच्या कार्यकत्र्यांनी प्राचार्य आणि परिक्षानियंत्रकाशी संपर्क साधला. नव्याने प्रश्नपत्रिका देण्यात येणार असल्याने. याविद्याथ्र्यांना नाश्ता व भोजनाची व्यवस्था करावी ही मागणी लावून धरली. तसेच बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थींनींना त्यंाच्या घरापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करा आणि ज्या विद्याथ्र्यांना गावी जाण्यासाठी गाडी नसेल त्यांची निवासाची व्यवस्था करा अशी मागणी लावून धरली.आंदोलकांचा पावित्रापाहून महाविद्यालयाने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. परिक्षा वेळेत त्यांना जलपान आणि पेपर संपल्या नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली.तथापी प्रश्नपत्रिकेचा गोंधळ करणाऐया प्रशासनाची चौकशी करून बेजबाबदार वर्तन करणाऐया कर्मचाऐयावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविपच्या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान सुधारीत प्रश्नपत्रिका देवून पेपर सुरू झाल्या नंतर परिक्षानियंत्रक ए.बी.चौधरी यांनी मु.जे.महाविद्यालयास भेट देवून चौकशी केली. या आंदोलनात रितेश चौधरी (नगरमंत्री), मानस शर्मा, पियुष भावसारसह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
 
४ परिक्षाकेंद्रावर ७० परिक्षार्थी . अभाविपच्या कार्यकत्र्यांच्या मागणीची दखल घेत चारही परिक्षाकेंद्रावर विद्याथ्र्यांना सोडण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याच्या सुचना
 

राज्यशास्त्रच्या परिक्षेला झालेला गोंधळ खेदजनक आहे. याची चौकशी करून दोषीवर काठोर करावाई करण्यात येईल.
- ए.बी.चौधरी, परिक्षा नियंत्रक, उ.म.वि.

विद्यापीठास काही दिवसांपूर्वीच परिक्षेतील गोंधळाबाबत निवेदन दिले होते. परंतु पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. यागोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक,शैक्षणीक व आर्थिक नुकसान होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करून योग्यती कारवाई करावी. अनेक अभ्यासक्रमाचे फोटो कॉपी आणि पुर्नर तपासणीचे निकाल अद्याप प्रलंबीत आहे हे निकाल त्वरीत जाहिर करण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- रितेश चौधरी, नगरमंत्री, अभाविप, जळगाव
 
@@AUTHORINFO_V1@@