बौद्ध धम्म हा भारत-मंगोलियाला जोडणारा धागा : स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |


उलानबातर : 'बौद्ध धम्म हा भारत आणि मंगोलिया या दोन्ही देशांना जोडणारा धागा असून या धाग्यामुळे भारत आणि मंगोलियातील मैत्रीपूर्ण संबंध भविष्यात वृध्दिंगत होतील' असे मत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. मंगोल राजधानी उलानबातर येथे बौद्ध धर्मगुरु कुशोक बाकुला यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी परराष्ट्र मंत्री डिमडीन सोग्तबातर हे देखील याठिकाणी उपस्थित होते.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगोलिया भेटीनंतर भारत आणि मंगोलिया यांच्यातील नव्या मैत्रीपर्वाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेत दोन्ही देशांमधील संबंध एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बौद्ध धम्म हा दोन्ही देशांच्या या मैत्रीमधला एक अत्यंत महत्वाचा धागा आहे. बौध्द धर्माचा उगम भारतीय भूमीत झाला. त्यानंतर तो जगभर पसरला. मंगोलियामध्ये देखील बौद्ध धर्माला अत्यंत महत्त्वाचे आणि आदराचे स्थान मिळाले आहे. यामुळेच भारत आणि मंगोलिया यांच्यात सांकृतिक संबंध देखील जोडले गेले आहे,' असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच याचा दोन्ही देशांना भविष्यातील आपल्या संबंधांसाठी खूप फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.




आपला चीन दौरा संपवल्यानंतर स्वराज या काल मंगोलियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. विशेष म्हणजे तब्बल ४२ वर्षांच्या अंतरानंतर पहिल्यांदाच भारतीय परराष्ट्र मंत्री हे मंगोलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे स्वराज यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@