एलबीएस रोडचे रुंदीकरण करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

सूर्यकांत गवळी यांची मागणी

 

 
 
 
मुंबई : पूर्व उपनगरात मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच्यालांब रांगा लागतात. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलबीएस रोडचे रुंदीकरण करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी केली आहे.
 
मुलुंड ते शीव दरम्यान एलबीएस रोड आहे. या रोडची रुंदी १०० फूट आहे परंतु पोलीस लाईन, चिराग नगर, टेलिफोन एक्सचेंज, सर्वोदय रुग्णालय आदी ठिकाणी १०० पेक्षा कमी रुंदीचा रोड असून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका येण्यास अडथळा होतो. तसेच एखाद्या ठिकाणी आग लागली तर अग्नीशमन दलाचे टँकर यायला जागा पुरेशी नाही. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना वेळेवर कामाला जाता येत नाही. मुलांना शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे एलबीएस रोडचे रुंदीकरण केल्यास नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असे भाजपचे नगसेवक सूर्यकांत गवळी म्हणाले.
 
तर विकास आराखड्यात पराशीवाडी परिसरात एक नवीन रस्ता प्रस्तावित आहे. परंतु त्यामुळे जास्त नागरिकांचे स्थलांतरित करावे लागेल त्याऐवजी सध्या जय महाराष्ट्रनगर गणेश मैदान येथे जो रस्ता आहे तोच पुढे वाढविण्यात यावा. त्यामुळे कमी नागरिकांना स्थलांतरित करावे लागेल, असेही ते म्हणाले
 
घाटकोपर पूर्वला नेव्हीचा वेगळा न्याय का ?
 
घाटकोपरमधील नेव्हीची मटेरिअल ऑर्गनायझेशन असल्याने बांधकामाला काही निर्बंध आहेत. घाटकोपर पूर्वला मटेरिअल ऑर्गनाईझशन १० मीटरच्या अंतरावर काही इमारती आहेत. त्यांनी १० ते १५ माळे बांधले आहेत. परंतु घाटकोपर पश्चिमला १५ मीटर पेक्षा लांब असलेल्या इमारतींना ही तीन माळे बांधण्याची परवानगी असून त्यामुळे विकास कामात अडथळा येत आहे. असे सांगत घाटकोपर पूर्वला नेव्हीचा वेगळा न्याय का असा सवाल सूर्यकांत गवळी यांनी उपस्थित केला.
 
@@AUTHORINFO_V1@@