आसारामबापू बलात्कार प्रकरण : थोड्याच वेळात निकाल येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जोधपुर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या विरोधात बलात्कार प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. जोधपुर मध्यवर्ती कारागृहात या निकालाची सुनावणी केली जाणार असून सध्या जोधपुरमध्ये तसेच आसपासच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. आसाराम बापूंच्या प्रकरणावर सुनावणीसाठी न्यायाधीश जोधपुर मध्यवर्ती कारागृहात सध्या पोहोचले आहेत. जोधपुरमधील रेल्वे स्थानक, बस, सार्वजनिक ठिकाण या सगळ्या ठिकाणी पोलिसाकडून कडक बंदोबस्त कालपासून ठेवण्यात आला आहे.
 
 
 
आसाराम बापूंच्या आश्रमात शिकत असलेल्या मुलीवर आसाराम यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात बापूंना अटक करण्यात आली होती. अत्याचारीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून बापूंना अटक ऑगस्ट २०१३ मध्ये झाली होती. आता याच प्रकरणाचा निकाल आज सुनावण्यात येणार आहे. बापूंचे समर्थक न्यायालयाबाहेर विरोध प्रदर्शन करू शकतात यामुळे आसाराम यांच्यावरील सुनावणी ही जोधपुर मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@