सत्यमेव जयते वाटर स्पर्धा, शिंदखेडा तालुक्यातील ३१ गावे सहभागी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

तालुका १८८४ पासून दुष्काळी असल्याची सरकार दप्तारी नोंद


 
 
मध्यरात्रीपासून होते श्रमदानाला सुरुवात
पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग अधिक
‘त्या’ गावांना मिळणार पोकलॅण्ड, जेसीबी
शिंदखेडा :
शिंदखेडा तालुक्यात सत्यमेव जयते वाटर स्पर्धेत ३१ गावांनी भाग घेतला असुन यात माथा ते पायथा यात काम करण्यात येणार आहे. पळणार्‍या पाण्याला चालायला लावणे, चालायला लावणार्‍या पाण्याला थांबवणे हे पाणी फाउंडेशनचे काम आहे. हा तालुका १८८४ पासून दुष्काळी तालुका असल्याचे जुन्या कागदपत्रांवरुन दिसून येते तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे.
 
 
चारी दिशांना वेगवेगळी परिस्थिती आहे.त्याचा अभ्यास करुन त्याप्रमाणे काम पाणी फांउडेशन काम करीत आहे. या स्पर्धेत मातीपरीक्षण, आगपेटी मुक्त गाव, शोष खड्डे याबाबींना गुण असून यात माती अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आहे. गावातील तरुण स्वेच्छेने या उपक्रमात भाग सामील होत आहे. गावातील तरुणांनी स्वत:ठरवून ७ तारखेस मध्यरात्री श्रमदानास सुरुवात केली. अनेक गावात तर पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कामात गावांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पाणी जिरण्यासाठी गावातील सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेणे आवश्यक आहे.
 
 
तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा संकल्प करणे आवश्यक असुन यासाठी तालुक्यातील जनतेने एकत्र येऊन हा लढणे आवश्यक आहे. यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 
 
या जलमित्र अभियानात सामील होण्याची २५ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन महाश्रमदान योजनेत सहभागी व्हा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे ज्ञानेश मगर यांनी केले आहे.
 
 
या योजनेत जैन संघटनेने २५० तासासाठी पोकलॅण्ड, जेसीबी उपलब्ध करुन दिले आहे. ज्या गावात ३ घनमीटर काम श्रमदानाने झाले आहे. त्या गावात हे मशीन उपलब्ध करुन दिले जात आहे. या स्पर्धेसाठी कुठले गाव निवडली जातात कुठले गाव या योजनेत विजयी होते हे पाहणे औस्त्सुक्याचे ठरले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@