कांग धरणातून आवर्तन सुटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

१४ बंधारे तुडुंब, २० गावांची टंचाई मिटली
जलसंपदामंत्री ना. महाजनांनी केले जलपूजन; उन्हाळ्यात खळाळली कांगनदी

 

 जामनेर :
कांग धरणातून नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आले. या नदीवर जामनेरपर्यंत बांधलेले १४ बंधारे या आवर्तनाने उन्हाळ्यात तुडुंब भरले आहेत. काठावरील दोन्ही बाजूच्या २० गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
 
 
जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. फत्तेपूर परिसरात टाकळी व हिंगणे या ठिकाणी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधार्‍यात प्रथमच पाणीसाठा झाला. त्या निमित्ताने रविवारी जलपूजन झाले. कांग नदी फत्तेपूरपासून तर जामनेरमार्गे हिवरखेड्याजवळ वाघूर धरणाला मिळते. दरम्यान, २५ ते ३० किलोमीटर अंतरात पूर्वीचे चार केटीवेअर आहेत. तर टाकळी येथे ७५ लाख व मेहेगाव येथे ६० लाख रूपये खर्चून दोन बंधारे बांधण्यात आले.
 
 
कांग धरणातून पाणी सोडल्याने त्या बंधार्‍यात प्रथमच पाणीसाठा झाला. जलपूजन करताना पंचायत समितीचे माजी उपसभापती नवलसिंग पाटील, पंचायत समिती सदस्य एकनाथ लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य संजय चौधरी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भंसाली, चिंचोलीपिंप्रीचे सरपंच विनोद चौधरी, सामरोदचे सरपंच श्रीकांत पाटील, शाखा अभियंता एस. बी. पाटील, साईट इंजिनिअर एम. एल. पाटील यांच्यासह फत्तेपूर ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
दोन वर्षांत बांधले गाळरोधक नऊ बलून बंधारे
वाघूर पाणलोट क्षेत्रातील गाळ वाहून वाघूर धरणात जाऊ नये, यासाठी कांग नदीवर गेल्या दोन वर्षांत मंत्री महाजन यांच्या संकल्पनेतून नऊ गाळरोधक बलून बंधारे बांधण्यात आले. गाळरोधक असले तरी त्याचा उपयोग पाणीसाठ्यासाठी होतो. उन्हाळ्यात कांग धरणातून पाणी सोडल्यास फत्तेपूरपासून तर जामनेरपर्यंत कांग नदी तुडुंब भरलेली असते. धरणातून आवर्तन सोडल्याने १५ ते २० गावांचा पाणीप्रश्न सुटल्याने दिलासा मिळाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@