दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकावर तलवारीने वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
जळगाव :
दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग आल्याने दोघांनी एकावर तलवारीने वार केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास गिरणा टाकी परिसरात घडली.
 
 
याबाबत कैलास भाऊराव पवार (वय ४८, रा.यशवंतनगर, जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अनिरुद्ध डहाळे उर्फ खंड्या व एक अनोळखी इसम हे दुचाकीवरून गिरणा टाकी परिसरात आले. त्यांनी कैलास पवार यांच्याजवळ दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु, पवार यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने वार करत दुखापत केली. तसेच त्यांच्या खिशातून ४ ते ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. या घटनेनंतर पवार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांविरुद्ध भादंवि कलम ३९४, ३४ आर्म ऍक्ट ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@