ज्येष्ठ नागरिक हे संस्काराचे विद्यापीठ : देवयानी फरांदे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : आज सगळीकडे विभक्त कुटुंबपद्धती वाढत चालल्याचे आपण बघतो, या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरातील मुलांवर, नातवांवर पाहिजे ते संस्कार होत नाहीत. आई-वडिलांना नोकरीच्या निमित्ताने मुलांवर लक्ष देण्यास पुरेसा वेळ नाही. ज्यांच्यामुळे मुलांवर संस्कार होतात, तेच आजी-आजोबा घरात नाहीत. त्यामुळे ही पिढी नको त्या मार्गाने भरकटत चालली आहे. ज्या घरात आजी-आजोबा आहेत त्या घरात संस्काराचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे संस्कार ज्यांच्यावर रुजले ते समाजात सर्वच ठिकाणी पुढे असल्याचे प्रतिपादन नाशिक मध्यच्या आ. देवयानी फरांदे यांनी केले.
 
लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे विवाहास ५० वर्षे पूर्ण झालेल्या ५० दाम्पत्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार फरांदे बोलत होत्या. यावेळी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच हा उपक्रम गेल्या १२ वर्षांपासून करीत असून आजतागायत ६०० जोडप्यांचा सत्कार या संस्थेने केलेत, याबद्दल लोकज्योतीचे विशेष अभिनंदन केले. चौधरी यात्रा कंपनीने सुरू केलेल्या हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर मधुकर झेंडे, अपोलो हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. अनुज तिवारी, मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, कार्याध्यक्ष डी. एम. कुलकर्णी, सचिव रमेश डहाळे, संजय घरटे, कोषाध्यक्ष जितेंद्र येवले, विश्वास बँकेच्या मनिषा पगार, रंजनभाई शाह आदी उपस्थित होते. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे माजी कार्याध्यक्ष कै. पुंडलिकराव घरटे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येणार्‍या ‘कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्काराचे’ वितरण करण्यात आले. यामध्ये नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, शिवाजी चौक सिडको, श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, प्रमोदनगर, गंगापूर रोड व जीवनसंध्या ज्येष्ठ नागरिक संघ, गांधीनगर या तिन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, हास्य क्लब त्याचप्रमाणे वसंतराव पुंड, विठ्ठलराव सावंत, श्रीकृष्ण शिरोडे, रंजनभाई शाह, एस. एस. वाणी, बाळकृष्ण दंडगांवकर, राजेंद्र जोशी, चंद्रकला जोशी, चंद्रकांत भालेराव, आर. जी. महाजन, वसंतराव बाविस्कर, त्र्यंबक सस्ते, दिवाकर जोशी, ज. रा. पाटील, सबनीस, दीक्षित, प्रकाश कुलकर्णी, भणगे, किशोर कुलकर्णी, सुरेंद्र गुजराथी, आर.आर.जाधव, सुशील नागमोती, देवराम सैंदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
@@AUTHORINFO_V1@@