लग्न १० दिवसांवर असताना नवरदेव अचानक बेपत्ता !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला नाशिकला गेलेला खडका येथील तरूण गायब

जळगाव :
नाशिक येथे स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला गेलेला भुसावळ येथील नवरदेव अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. समाधान भास्कर बुगले (वय २८, रा. खडका, भुसावळ) असे या नवरदेवाचे नाव असून २८ एप्रिल रोजी त्याचा विवाह आहे. याप्रकरणी नाशिक येथील भद्राकाली पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
 
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ येथील खडका परिसरात राहणारा समाधान बुगले याचे २८ एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. नाशिक शहरातील राजीव नगरात राहणार्‍या आतेबहिणीस लग्नाची पत्रिका देण्यासाठी तो १८ एप्रिल रोजी गेला होता. धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली येथून तो धुळे-नाशिक बायपास बसने तो नाशिकला निघाला होता. नाशिकमध्ये पोहचल्यानंतर तो द्वारका येथे उतरला. तत्पूर्वी त्याने बहिणीला फोन करून तशी माहिती दिली होती. मात्र, नंतर त्याचा संपर्कच झाला नाही. त्याच्याकडे असलेले दोन्ही मोबाईल क्रमांक बंद येवू लागले. अवघ्या काही दिवसावर लग्न सोहळा येऊन ठेपल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली. परंतु, समाधान याचा तपास न लागल्याने शेवटी आतेबहिण मनिषा श्रीराम महाजन (वय ३८, रा. राजीव नगर, नाशिक) यांनी नाशिक येथील भद्राकाली पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. अजूनही त्याचा शोध
लागलेला नाही.
 
समाधान ‘महावितरण’ कंपनीत नोकरीला
समाधान बुगले हा महावितरण कंपनीमध्ये नोकरीला आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना नवरदेव गायब झाल्याने नवरदेव व नवरीकडील नातेवाईक मंडळी चिंतेत आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचे काही दिवसांपूर्वीचे लोकेशन चाळीसगाव आले होते. मात्र, नंतर त्याचा मोबाईलच बंद असल्याने त्याचे निश्‍चित असे लोकेशन पोलिसांना मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे लग्नाची सर्व तयारी झालेली आहे. मात्र, नवरदेवच बेपत्ता असल्याने पुढे काय? हा प्रश्‍न दोन्ही परिवारांसमोर आहे.
 
कारण अद्यापही गुलदस्त्यातच
लग्न अवघ्या १० दिवसांवर असताना समाधान बुगले अचानक बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता का झाला आहे? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. समाधान बेपत्ता झाल्याची तक्रार भद्राकाली पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. त्याचा काही घातपात झाला का? किंवा त्याच्या बेपत्ता होण्यामागे अन्य कारण आहे? याचा छडा लावण्याचा पोलिसांनी तपास केला. परंतु, पोलिसांना त्यात अपयश आले.
@@AUTHORINFO_V1@@