कर्नाटकातून आले ३ हजार उमेदवारी अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |





बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातून एकूण तीन हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक आयोगाकडे जमा झाले आहेत. राज्यातील विविध मतदारसंघांमधून हे अर्ज आले असून या सर्व अर्जांच्या छाननी करण्यास अगोगाकडून सुरुवात करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाडून आजच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची कालची अंतिम तारीख होती, त्यानुसार काल संध्याकाळपर्यंत संपूर्ण राज्यातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज जमा करण्यात येत होते. यानंतर हे सर्व अर्ज आज राज्य आयोगाकडे जमा झाले. यामध्ये २२४ मतदारसंघांमधून एकूण ३ हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज आयोगाकडे जमा झाल्याची माहिती स्वतः आयोगाने दिली. याच बरोबर या सर्व अर्जांची पुन्हा एकदा छाननी करण्यास आता सुरुवात करण्यात आली असून अपात्र अर्ज यातून बाजूला काढले जातील. तसेच काही उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्याची इच्छा असेल तर त्यांना देखील आपला अर्ज मागे घेता येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

येत्या १२ तारखेला राज्यात सार्वत्रिक मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच १५ तारखेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये हा उघड-उघड मुकाबला असल्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकांमध्ये विजय होण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच वापरत असल्याचे सध्या दिसत आहे. परंतु राज्यातील जनता मात्र कोणाला आपला कौल देणार, यावर राज्याचे आणि राजकीय पक्षांचे भवितव्य ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@