नगरदेवळा अग्नावती मध्यम प्रकल्पस्थळी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ चा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
 
 
नगरदेवळा :
अग्नावती मध्यम प्रकल्पस्थळी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या कार्यवाहीचा शुभारंभ तालुक्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचूरे यांनी केला.
 
 
मध्यम प्रकल्पातील गाळ हा चांगल्या प्रतीचा असून शेतकर्‍यांनी आपल्या शेतात योग्य त्या प्रमाणात हा गाळ टाकल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल.
 
 
अनुगामी लोकराज्य महाअभियान अनुलोम अंतर्गत तळागाळातील जनतेला शासकीय योजनांची माहिती करून देवून त्याचा लाभ मिळवून देणे हा अनुलोम चा उद्देश असल्याचे अनुलोम चे जनसंपर्क अधिकारी विकास लोहार यांनी सांगितले. यावेळी प्रा. उमेश काटकर, गणेश देशमुख, मोनु लढे, अतुल देशमुख, दत्तू कोळी, दीपक परदेशी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
 
शेतकर्‍यांना प्रत्येक ट्रॉलीमागे डिजेल अनुदान
तसेच ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली असेल त्यांना शासनाकडून प्रत्येक ट्रॉलीमागे तीस ते बत्तीस रुपये डिजेल अनुदान मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@