२००१ ते २००९ मधील थकीत खातेधारकांना मिळणार शेतकरी कर्जमाफीचा लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 

 
 
मुंबई : २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकबाकीधारकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच २००८ आणि २००९ साली जाहीर झालेल्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतक-यांनाही या निर्णयामुळे दिलासा देण्यात आला आहे.
 
इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊस यासाठी २००१ ते २०१६ या कालावधीत घेतलेल्या मात्र थकित राहिलेल्या कर्जाचाही समावेश या योजनेत करण्याचा निर्णय बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे. १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत घेण्यात आलेल्या कर्जाची ३० जून २०१६ पर्यंतची थकीत रक्कम परतफेड केलेल्या रकमेतून वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या मुद्दल आणि व्याजासह दीड लाखांपर्यंत वगळण्यात येणार आहे.
 
 
तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या थकित शेतकऱ्यांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून दिलासा देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यांनादेखील दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयांची अंमलबजावणी करताना २००८ ते २००९ मध्ये अनुक्रमे केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या कर्जमाफी योजनांचा फायदा मिळाला नसल्याबाबत शेतकरी व बँकांकडून घोषणापत्र घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@